ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

मोकाशी कॉलेज चा निकाल शंभर टक्के


कराड -राजमाची येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित वेस्टफिल्ड ज्युनियर कॉलेजचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला .सायन्स शाखेमध्ये ऋतुजा यादव हिने 93 .67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . जान्हवी देसाई 93. 17,’फराज खान हिने 91.83, विनायक यादव यांनी 89. 17 , प्रतीक्षा पवार हिने 86 .33 गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी पटकावली .एकूण चाळीस विद्यार्थी 40 होते .त्यापैकी 25 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी मध्ये तर उरर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी ,सचिव अभिजित मोकाशी , प्राचार्य, केंद्रप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .प्रतिष्ठानच्या वेस्टफिल्ड कॉलेज तसेच मोकाशी एज्युकेअरला प्रवेश घ्यावा असे आवाहन विलास चौधरी यांनी केले आहे .

error: Content is protected !!