ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हॉटेल,रेस्टॉरंट,यांना रात्री १० पर्यंत परवानगी

देवाचा बंदिवास कायम
मुंबई/ कोरोंनाच्या भीतीने गारठलेल्या सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत हळू हळू उद्योग धंदे सुरू करायला परवानगी दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटेल्स,रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या लढ्याला यश आले आहे .पण नाटयगृहे,चित्रपट गृह आणि मंदिरे बंदच राहणार आहेत
.
कोरोंनाच्या संकटांमुळे गेल्या वर्षभरापासून हॉटेल व्यवसाय बंद होता त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या होत्या त्यानंतर सरकारने जे कठोर निर्बंध घातले होते ते थोडे शिथिल केले आणि हॉटेल व्यावसायिकांना दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल उघडी ठेवण्याची परवानगी दिली मात्र या काळात धंदा होत नसल्याने वेळ वाळवून देण्याची मागणी हॉटेल व्यवसायिकांनी केली होती. त्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण त्यांना आपल्या समस्या सांगितल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली.दरम्यान २५जिल्ह्यातील कोरोंना पोजिविटीव रेट कमी झाल्याने. या जिल्ह्यांमधील दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे .आज झालेल्या बैठकीत हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र मॉल्स आणि चित्रपट गृह अजूनही बंदच राहणार आहेत सरकारने परवानगी दिल्याबद्दल हॉटेल व्यावसायिकांनी आभार मानले असून आम्ही कोरोंना प्रतिबंधक सर्व नियम पळू असे आश्वासन दिले आहे


बॉक्स/ हॉटेल चालू मंदिरे बंद हा तर अन्याय!राज्य सरकारने दुकाने उघडण्यास तसेच उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी दिली मग मंदिरे उघडण्यास परवानगी का नाही असा संतप्त सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी केला असून या अन्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे

लग्नाला १०० पण प्रेताला मात्र २० जनानाच परवानगी
काल राज्य सरकारने निरबंधनमध्ये शिथिलता देताना लग्न कार्यासाठी १०० जणांना परवानगी दिली आहे तर प्रेताला मात्र २० जननाच परवानगी असेल हे काहीसे विचित्र असल्याचे लोकांचे म्हणणे आहे

error: Content is protected !!