ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर – शुक्रवारी अटल सेतूचे उदघाटन करणार


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी १२. १५ च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी ४. १५ च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पाहूयात पंतप्रधान मोदींचा संपूर्ण दौरा….
नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून ‘सुलभ गतिशीलतेला’ चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती.
अटल सेतू, एकूण १७, ८४० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे २१. ८ किमी लांबीचा ६ पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे १६. ५ किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे ५.. ५ किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतुक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे.

error: Content is protected !!