ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे च्या मतदार संघात भाजपची दहीहंडी


मुंबई/आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारसंघांवर भाजपची नजर आहे या मतदारसंघातील भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात यावर्षीही भाजपने जांभळी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
भाजपाच्या या दहीहंडीची सध्या वरळीत जोरदार चर्चा सुरू आहे हा दहीहंडी उत्सव जास्तीत जास्त भव्य दिव्य व्हावा यासाठी काही स्नेक कलाकार नाही बोलावण्यात येणार असल्याचे समजते ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतून सगळे मोठे गोविंदा वरळीमध्ये येणार आहेत या दहीहंडी उत्सवाला एक मोठा इव्हेंट बनवण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेली आहे कारण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या याच मतदारसंघात त्यांना धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केलेली आहे त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत दरम्यान आमच्या दहीहंडीची कुणीही बरोबरी करू शकत नाही असे शिवसेनेचे उपनेते सचिन भाऊ अहिर यांनी म्हटले आहे त्यामुळे वरळीतील हा दहीहंडी उत्सव राजकीय दृष्ट्या खूप मोठा समजला जात आहे

error: Content is protected !!