ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

आज हनुमान जयंतीच्या दिवशीच पुण्यात राजकीय राडेबाजीचा धोका

पुणे/ राम भक्तीचा महामेरू,दयेचा सागर आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या हनुमंताच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात राडेबाजीला सुरुवात झाली आहे आणि तिला नेमका आज हनुमान जयंती चा मुहूर्त मिळाला आहे त्यामुळे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्य नगरीचे आज कुरुक्षेत्र होण्याची शक्यता आहे पुणेकरांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे .
आज माणसे तर्फे पुण्याच्या खालकर चौकातील पुरातन हनुमान मंदीरात महा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे आणि स्वतः राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुण्यातील साखळी पीर येथील हनुमान मंदीरात चक्क इफ्तार पार्टीत आयोजन राष्ट्रवादीने केले आहे यावेळी मुस्लिम बांधवांच्या हस्ते हनुमंताची आरती केली जाणार आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते हजर राहणं आहेत त्यामुळे पुण्यातील वातावरण तणावपूर्ण आहे .दरम्यान रवी रणा यांच्याही अंगात आता मारुती संचारला असून त्यांनी थेट मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आहे तर ते आल्यास त्यांना फटके देऊन हनुमान बनवू असा शिवसैनिकांनी इशारा दिला आहे त्यामुळे आजची हनुमान जयंती चांगलीच गाजणार आहे

error: Content is protected !!