ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुड गोइंग! नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा पाठींबा -आता खरी लढाई सुरू

मुंबई,/ नवाब मलिक यांनी एन सी बी आणि वानखेडे यांच्या विरोधात सुरू केलेली लढाई आता भाजप नेत्यांविरोधात येऊन ठेपली असून या लढाईत मलिक एकाकी असतील असे आतापर्यंत वाटत होते पण आता मात्र संपूर्ण मंत्रिमंडळाने मालिकांच्या लढाईला पाठींबा दिलेला आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सुरू होणार आहे
गेल्या काही दिवसांपासून मलिक यांनी रोज पत्रकार परिषदा घेऊन सुरवातीला एन सी बी आणि वानखेडे यांना टार्गेट केले होते वानखेडे मुस्लिम असल्यापासून तर त्यांचे जातीचे सर्टिफिकेट खोटे असल्यापर्यंत सर्व प्रकारचे आरोप मालिकांनी केले त्यानंतर वानखेडे यांच्याकडून आर्यन सह सहा प्रकरणाचा तपास कडून घेण्यात आला त्यानंतर मालिकांनी भाजप नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केली नीरज पांदेव्या दलालाचे फडणवीस यांच्याशी कसे संबंध होते आणि त्यांच्याच काळात ड्रग धंदा कसा सुरू होता याबाबत गौप्यस्फोट केला त्यानंतर फडणवीस यानी मलिक यांच्या वर पलटवार करताना त्यांनी बॉम्ब स्फोटातल्या आरोपींकडून कशी जमीन खरेदी केली ते सांगितले त्यावर फडणवीस यांचा बनावट नोटांच्या उद्योगात कसा हात आहे ते फडणवीस यानी सांगितले अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी मलिक यांच्या लढ्याला पाठींबा असल्याचे जाहीर केले त्यामुळे आताही लढाई मलिक विरुद्ध भाजप अशी राहिली नसून महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी सुरू होणार आहे आणि त्यात आणखी काही गौप्य स्फोट होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!