ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा रद्द


सरकारला न्यायालयाचा दणका
मुंबई/ अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने सी ई टी परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून दहावीच्या निकालावर प्रवेश दिला जाणार आहे .यावर्षी कोरोंनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा झाली नव्हती दहावी बारावीचा निकाल मूल्यक्वावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी ची अट घातली होती त्यानुसार १९ जुलै ते २ऑगस्ट या कालावधीत ऑन लाईन अर्ज भरण्यास सांगितले होते .त्याला काही पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन विरोध दर्शवला होता त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सी ई टी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

error: Content is protected !!