ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?

मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मला माझा मंत्री म्हणू नका कारण दोनतीन दिवसात बघा महाराष्ट्रात काय घडते ? आता चंद्रकांत दादांचे हे विधान म्हणजे नुसतीच राजकीय पूडी आहे की सतातराच्या दृष्टीने भाजपने घेतलेली एक मोठी उडी आहे . याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे .
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपा गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे . पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही.पण सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक मतभेद वादळे आहेत . शिवाय तिन्ही पक्षातले जे आमदार ई डी च्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत .त्यांना भाजपशी जुळवून घ्यायचे आहे.आणि स्वतःला वाचवायचे आहे आणि अशाच आमदारांवर भाजपची सुरवातीपासूनच नजर आहे .भाजपाचे काही नेते या आमदारांच्या संपर्कात असल्याचे समजते कदाचित त्यामुळेच गेल्या दोन चार दिवसात काही वेगळी समीकरणे जुळून आली असतील आणि म्हणूनच चंद्रकांत दादांनी महाराष्ट्रात पुढील दोन तीन दिवसात काहीतरी मोठी राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत दिले असतील. देहू येथील कार्यक्रमात सूत्र संचालन करणाऱ्याने चंद्रकांतदादा यानचा माजी मंत्री असा उल्लेख केला होता . त्यावर चंद्रकांत दादांनी आता माझा नाही . तीन दिवसात काय होते ते बघा असे म्हणून काहीतरी वेगळे घडणार असल्याचे संकेत दिले होते .

error: Content is protected !!