ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

अचानक बेस्ट बसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले- प्रवाशांकडून संताप व्यक्त

मुंबईतील बेस्टची बससे सेवा शिस्तबध म्हनुण प्रसिध्द आहे .या सेवाचे देशभर कौतुक होते . ोविड काळात बेस्टने मुंबईकरांना दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. मुंबईची रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने उतम सेवा दिली . परतू बेस्टच्या अध्यक्षपदावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा सोयीचा माणूस आणि महाव्यवस्थापक बसवला जाऊ लागला त्यापासून या सेवेचे अध;पतन सुरू झाले .अचानक बेस्टने प्रवाशांचे अनेक मार्ग बदलून व काही मार्ग खंडित करून प्रवाशांना दुखावण्याचे आणि त्रास देण्याचे काम केले आहे. बेसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले याचा परिणाम काय होईल याचा विचार न करता थेट अंमलबजावणी सुरू केली . मंत्रालय ,बोरीबंदर ,हुतात्मा चौक ,ऑपेरा हाऊस, राणी लक्ष्मीबाई चौक, मुंबई सेंट्रल ,अंधेरी ,बोरोवली,घाटकोपर, मुलुंड पर्यंत बसच्या स्टॉपवर मोठया रांगाच रांगा दिसू लागल्यात . या बदलाचा परिणाम जनतेवर होऊन प्रवाशांनी संताप व्यवत केला आहे.
बेस्ट अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्ट सेवेचा बट्ट्याबोळ करण्याचे ठरवले असल्याचे चित्र समोर येत आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत त्यावेळी लोकप्रतिनिधींना इंगा दाखवण्याच्या तयारीत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त करून आपला संताप व्यक्त केला आहे .

error: Content is protected !!