ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

चौकाच्या नामकरणाच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे ‘हम साथ साथ है’ ; बोरिवलीत भाजपचे गोपाळ शेट्टी आणि शिवसेनेच्या विशाखा राऊत, विश्वनाथ नेरुरकर एका मंचावर

                        मुंबई, दि. (प्रतिनिधी)   : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे.  यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’  च्या भूमिकेत  असल्याचे कळते.  सप्टेंबर २०१३ मध्ये राजेंद्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेली चाळीस वर्षे नेतृत्व करणारे गणेशभक्त प्रताप दाजी रात यांचे आकस्मिक निधन झाले.  ते शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि विविध संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.  प्रताप रात यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आसावरीताई पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला.  भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शिवसैनिकाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला. महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चौकाचे नामकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विशाखा राऊत यांच्यासह बाळ राणे, शाम कदम, मनोहर देसाई, चेतन कदम, शर्मिला शिंदे, कांचन सार्दळ, अशोक परब, राजा खोपकर यांच्यासह  शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटले.  या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का? ‘हम साथ साथ है’चा प्रयोग यापुढे सुरु राहणार का?  असे प्रश्न लोक एकमेकांना विचारतांना दिसत आहेत.

error: Content is protected !!