ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

१५ ऑगस्ट पासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा


मुंबई/ अखेर मुंबईकरांना देव पावला आणि त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची सुबुद्धी दिली. त्यानुसार १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह वरून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार असे जाहीर होताच उद्धव ठाकरे काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते त्यानुसार आज त्यांनी रात्री ८वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना कोरोंना अजून गेलेला नाही त्यामुळे सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे लोकांनीही सावधगिरी बाळगायला हवी टास्क फोर्सच्या सल्ल्या नुसार प्रत्येक गोष्टीत हळू हळू शिथिलता दिली जात आहे. या काळात हॉटेल असोसिएशनचे लोक येवून भेटले त्यांनी वेळ वाढवून मागितली त्यांनाही मी काही गोष्टी समजावून सांगितल्या .त्या त्यांनी एकल्या आता दुकानांच्या वेळा वाढून दिल्या आहेत .कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन अजून आठ दिवस काही गोष्टी शिथिल करण्यासाठी थांबावे लागेल. राहता राहिला सवाल लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्याचा तर ज्यांनी कोरोंना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन पांढरा दिवस झाले आहेत. अशा लोकांना १५ऑगस्ट पासून लोकल प्रवासाची परवानगी असेल त्यासाठी ऑफ आणि ऑन लाईन दोन दोसचे प्रमाणपत्र दाखवून पास किंवा तिकीट मिळवता येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला अतिवृष्टीने संकट आणि त्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनाची माहिती दिली
.

error: Content is protected !!