[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हेमंत करकरे यांच्या मृत्यू वरून राजकारण तापले – उज्वल निकम यांच्यावर टीका करणारे वडेट्टीवार अडचणीत


मुंबई/२६/११ चां मुंबई वरील हल्ल्यात एटीएस चे तात्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही तर संघाचा समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला मात्र ही माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी लपवून ठेवली त्यामुळे निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विरुद्ध भाजपने आंदोलन केले होते पण आता ते विधान वडेट्टीवार यांचे वैयक्तिक मत आहे असे सांगून काँग्रेसने यातून हात झटकले आहेत त्यामुळे वडेट्टीवार अडचणीत आले आहेत
माझी पोलीस महानिरीक्षक मुश्रीफ यांच्या २००९ साली व्हू किल करकरे नावाचे एक पुस्तक आले होते त्यात करकरेंचा खून झाला आणि तो संघाचा समर्थक आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने केला असा उल्लेख आहे त्यावरून हा वाद सुरू झाला आहे

error: Content is protected !!