ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

निवडणुकीत केले काम दिसण्यासाठी -नगरसेवकांची विकास निधी वापरण्याची घाई

मुंबई/ नगरसेवक इतर वेळी त्यांच्या वार्ड मध्ये फारशी कामे करीत नसले तरी निवडणुका आल्यावर मात्र विकास कामांचा सपाटा लावतात कारण लोकांना दिसायला हवेना ! नगरसेवकाने काहीतरी केले आहे.
यंदाही तसाच प्रकार सुरू आहे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन इतर योजनांसाठी पडून असलेला निधी आता पायाभूत विकासकामांसाठी वळवला जात आहे
बोरिवली प्रभाग नऊच्या काँग्रेस नगरसेविका १ कोटींचा निधी स्मशानभूमी आणि प्रसूती गृहासाठी ठेवण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणामुळे हा निधी वापरता येत नसल्याने त्यांनी हा निधी स्थानिक नागरिकांच्या नागरी सुविधांसाठी वापरलाा. प्रभाग क्रमांक १७३ सेनेचे नगरसेवक कांबळे यांना टॅब साठीचा ५५ लाखांचा निधी होता त्यातील २० लाख त्यांनी वॉर्डातील विकास कामांसाठी वापरले तर सतमकर हे सेनेचे जेष्ठ नगरसेवक त्यांच्या विभागासाठी सव्वा दोन कोटींचा निधी होता. त्यातील एक कोटी त्यांनी पायाभूत सुविधांसाठी वापरला म्हणजे पैसेही,खर्च करता आले आणि कामाचे श्रेय सुधा लाटता आले हाच त्या मागचा हेतू असे ,नागरिकांचे म्हणणे आहे

error: Content is protected !!