ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उत्तराखंड मध्ये समान नागरी कायदा मंजूर


देहारडून – मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समान नागरी संहिता विधेयक सभागृहात मंजूर केलं आहे. उत्तराखंड विधानसभेत युसीसी विधेयक मंजूर झाल्यानंतर, उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी आवाजी मतदानाने यूसीसी विधेयक मंजूर केले, हा प्रस्ताव ८० टक्के संमतीने मंजूर करण्यात आला.
सीएम धामी यांनी सभागृहात सांगितले की, “आज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असल्याने केवळ या सदनालाच नाही तर उत्तराखंडमधील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटत आहे.” पत्रकार परिषद देताना सीएम धामी म्हणाले की, 12 फेब्रुवारी 2022 रोजी घेतलेला संकल्प आज पूर्ण झाला आहे. या विधेयकाची संपूर्ण देशाने मागणी केली होती, जे आज देवभूमीत मंजूर करण्यात आले. लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते पण आज चर्चेदरम्यान हे स्पष्ट झाले की हा कायदा कोणाच्या विरोधात नाही. असे सांगितले.

error: Content is protected !!