ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शरद पवारांच्या पक्षाला मिळाले तात्पुरते नाव

नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आज केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असं नवीन नाव निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलं आहे. त्यावर अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाला अशाच पद्धतीने तात्पुरतं नाव देण्यात आलं होतं, ते आता कायम राहिलं आहे. त्याच पद्धतीने आता शरद पवार गटाला मिळालेलं नाव आणि चिन्हंही कायम राहण्याची शक्यता आहे
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.
पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला अद्याप चिन्ह देण्यात आले नाही. चिन्हाबाबत पवार गटाकडून पर्याय देण्यात आलेत. शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!