ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण

मुंबई दि 3:- ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, वेब सीरिज या विश्वातील गुणवंतांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला.

‘मटा सन्मान’ सोहळ्यात
गुंतवणूक तज्ञ रचना रानडे यांना युथ आयकाॅन पुरस्कार,
स्वच्छतादूतांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील ‘स्वच्छ’ संस्थेस, ‘वसुंधरा साथी’ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार संगीतकार अशोक पत्की यांना तर विशेष सन्मानाने दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मटा सन्मान’ सोहळा ही एक चांगली परंपरा आहे. अशा पुरस्कारांची समाजासाठी आवश्यकता आहे. प्रसिद्धीपासून दूर रहात
सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे. सामाजिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र टाईम्स नेहमीच अग्रेसर असतो.
संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे.

चित्रपट सृष्टीला अधिकाधिक सहकार्य करण्यासाठी, पाठबळ देण्यासाठीचे निर्णय घेण्यात येत आहेत.
त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील.
भारतरत्न लता मंगेशकर
अकादमीही उभारण्यात येत आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणारे स्वच्छतादूत तसेच संस्था यांना देखील सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

जीवनात संगीताच्या गुंतवणूकीने मनं स्वच्छच होतात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
‘मटा सन्मान’ सोहळा
हा रसिक आणि कलाकारांना आपलासा वाटणारा सन्मान आहे. आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संगीतकार अशोक पत्की यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. अशोक पत्की यांच्या संगीताची जादू अनोखी आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना निखळ आनंद आजही देत आहेत. माणसाच्या जीवनात जर संगीताची गुंतवणूक केली तर मन स्वच्छच होतं असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.
—–000—–

error: Content is protected !!