ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उध्दव ठाकरे फडणवीस यांच्यासह भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकणार होते- मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

*
मुंबई/लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंगात आलेल्या आहे आणि सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. एकमेकांची उनी धुनी काढत आहेत यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अक्षरशा एकमेकांचे लफडी बाहेर काढण्याची स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावर कठोर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांना तुरुंगात डा बण्याच कट रचला होता. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे भाजपचे २५ आमदार फोडणार होते. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. खुद्द उद्धव ठाकरेही या आरोपामुळे हैराण झाले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना आनंदी दिघे यांचाही विषय काढला. आनंद दिघे यांच्याबाबत उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत. तसेच आनंद दिघे यांचा सच्चा कार्यकर्ता मी स्वतः होतो .तर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असलेले राजन विचारे हे आनंद दिघे यांचे नकली भक्त होते. त्यांनी कधीही आनंद दिघे यांचे मनापासून ऐकले नाही असाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोप केला आहे

error: Content is protected !!