ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुजोर व्यापाऱ्यांना पालिकेचा दणका – मालमत्ता कराएवढी दंडाची रक्कम आकारताच दुकानावर मराठी पाट्या लागल्या


मुंबई/या देशात मुंबईला फक्त सोन्याची कोंबडी समजली जाते. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील लोक इथे येऊन पैसे कमवतात परंतु मुंबई बद्दल त्यांना कधीही प्रेम किंवा असता वाटली नाही मुंबईत यायचं पैसे कमवायचे आणि आपापल्या गावी जायचं त्यांनी कधी मराठी भाषेचा आदर केला नाही की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर केला नाही सर्वात जास्त मुजोरी इथले व्यापाऱ्यांची होती त्यांचा हितला धंदा पाणी मराठी माणसांवर अवलंबून आहे तरीसुद्धा ते मराठीला भाव देत नव्हते दुकानावर मराठी पाट्या लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते परंतु न्यायालयाच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवली अखेर मुंबई महानगरपालिकेने या मुजोर व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एक नामी शक्कल लढवली पालिकेने मालमत्ता कराएवढीच दंडाची रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला हा निर्णय धाडसी होता . त्यामुळे पालिकेच्या या धाडसी निर्णयाचे काय होणार अशी प्रत्येकाच्या मनात शंका होती परंतु ती शंका आता दूर झाली आणि मराठी पाट्या लावण्यास नकार देणाऱ्या मुजोर व्यापाऱ्यांनी आता दंडाच्या रकमेच्या भीतीने आपापल्या दुकानावर मराठी पाट्या लावायला सुरुवात केली आहे हा एक प्रकारे मुंबईतील मराठी माणसाचा विजय आहे. मराठी माणसाचा विजय आहे हे पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते कारण मराठी माणसाच्या न्याय्य हक्काची मक्तेदारी घेतलेले पक्ष यांना मराठी पाट्यांबाबत पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय त्या लोकांना देता येणार नाही असे मुंबईतल्या मराठी माणसांचे म्हणणे आहे

error: Content is protected !!