ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

नायरच्या त्या डॉक्टरांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई/ बी डी डी चाळ सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमींवर उपचार करण्यास नायर मधील ज्या डॉकटर आणि परीचारिकेने निष्काळजीपणा केला त्यांच्या विरोधात परभग २०७ च्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी अगरी पाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून या प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
वरळी येथील बी डी डी चाळीत १डिसेंबर रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन चार माणसे गंभीर जखमी झाली होती त्यांना पालिकेच्या नायर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉकटर नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांनी या जखमिंची गांभीर्याने दखल घेऊन उपचार केले नाहीत त्यामुळे पुरी कुटुंबातील चार महिन्याच्या बाळाचा मृत्य झाला या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या शिष्टमंडळाने तात्काळ नायरच्या डीन ची भेट घेऊन त्यांना याबाबत जाब विचारला होता यावेळी त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोघांना निलंबित करण्यात आले होते मात्र या घटनेनंतर पालिका रुग्णालयातील डॉकटर नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा चां मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत त्यामुळे आता तरी पालिका आरोग्य सेवेकडे गांभीर्याने लक्ष देईल का असा प्रश्न विचारला जात आहे
दरम्यान पिढीत कुटुंबाला २५लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपने केली असून या घटनेच्या निषेधार्थ आरोग्य समितीतील भाजपच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

error: Content is protected !!