ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

किवचा सर्वनाश जागतिक युद्ध भडकण्याच्या मार्गावर


कीव/ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे आता तिसऱ्या महा युद्धात रूपांतर होण्याची वेळ आली आहे कारण रशियाने अणुबॉम्ब ची धमकी दिल्यानंतर नाटो देश आणि अमेरिका ही रणभूमीवर उतरण्यास सज्ज झाली असून आता काही वेळातच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो दुसरीकडे यूक्रेंची राजधानी कीव शहरातून सर्व भारतीयांनी बाहेर पडून सीमेच्या दिशेने जावे असे आदेश युक्रेन सरकारने दिल्यामुळे युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी जी ऑपरेशन गंगा मोहीम सुरू आहे त्यात आता हवाई दल सुधा सहभागी झालेले असल्याने या मोहिमेला गती आली आहे
युक्रेन मध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकले होते त्यातील बहुतेक राजधानी कीव मध्ये राहत होते .मात्र रशियाने किव्ह शहराला चरी बाजूंनी घेरले आहे रशियन हवाई दलाकडून सतत कीव वर बॉम्ब हल्ले होत आहेत आणि आता तर रशियाने अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे त्यामुळे युक्रेन ने भारतीयांना शहर सोडून दूर जाण्यास सांगितले आहे दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात बेलारूस मध्ये ज्या तीन बैठका झाल्या त्या निष्फळ ठरल्या आहेत कारण रशियाच्या अटी युक्रेन मान्य नाहीत उलट युक्रेन ने नातोचा सदस्य होऊ नये म्हणून रशियाने युक्रेन वर जो दबाव टाकला होता तो दबाव झुगारून युक्रेन ने काल नातोच्या सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला त्यामुळे पुतीन यांचा तिळपापड झालाय आणि ते आता युक्रेनच्या सर्वनाशाचा शंखनाद करून युक्रेन वर कोणत्याही स्थितीत अनु बॉम्ब टाकण्याच्या तयारीत आहेत

error: Content is protected !!