ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

शिवसेनेच्या निवडून आलेल्या संख्या 100 वर

मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता 100 वर पोहोचली आहे. 2017 मध्ये कुर्ला प्रभाग क्र. 159 मध्ये निवडून आलेले भाजपचे प्रकाश देवजी मोरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिवसेनेच्या कोमल जामसंडेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.त्यामुळे शिवसेनेच्या निवडून आलेल्या 98 नगरसेवकांसह व दोन स्वीकृत नगरसेवकांसह नगरसेवकांची संख्या 100 वर पोहोचली आहे.

शिवसेनेच्या जामसंडेकर यांनी कुर्ला एल विभागातील प्रभाग क्रमांक 159 मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे प्रकाश देवजी मोरे विजयी झाले होते. मात्र,त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला जामसंडेकर यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. अखेरीस पाच वर्षांच्या लढय़ानंतर गेल्या आठवडय़ात उच्च न्यायालयाने मोरे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यामुळे त्यांच्या जागी जामसंडेकर यांची निवड जाहीर करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार 28 फेब्रुवारीला महासभेत जामसंडेकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर सभागृहाच्या कामकाजात त्यांनी सहभाग नोंदवला.

error: Content is protected !!