ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार –मला थोडा वेळ द्या हा प्रश्न आपण अभ्यास करून नक्कीच सोडवू–राष्ट्रपती

दिल्ली/ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाची जी कोंडी झाली होती ती आता राष्ट्रपतींच्या भेटीनंतर फुटण्याची शक्यता आहे काल संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली . यावेळी राष्ट्रपतींनी या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काल सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले यावेळी संभाजी राजे यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाची १९०२पासून ची स्थिती राष्ट्रपतींना सांगितली यावेळी राष्ट्रपतींनी शाहू महाराज हेच आरक्षणाचे जनक असल्याचे मान्य केले .कारण १९०२ मध्ये शाहू महाराजांनीच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाला आरक्षण दिले होते दरम्यान मराठ्यांना आरक्षण देण्याचा ठराव राज्य विधिमंडळाने सर्वानुमते संमत केला होता आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतरच मुंबई उच्च न्यायालयाने मराठ्यांना आरक्षण देण्यास परवानगी दिली मात्र मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्वोच्च न्यायालय मानायला तयार नसल्याने त्यांनी आरक्षण रद्द केले . त्यामुळे आता मराठ्यांना एकतर ई सी बी सी स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या किंवा आरक्षणाची मर्यादा जी ५० टक्के आहे ती वाढवा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली राष्ट्रपतींनी अत्यंत शांतपणे शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व या प्रकरणी मला अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ द्या हा प्रश्न आपण नक्कीच सोडवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात संभाजी राजे यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार विद्या चव्हाण,काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे,भाजपा खासदार निबाळकर आदींचा
समावेश होता

error: Content is protected !!