ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कोरोनाच्या संकटकाळात देशभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

मुंबई – संपूर्ण संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असतानाच आज पासून महाराष्ट्रासह देशभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर या संपाचा गंभीर परिणाम होणार आहे. तर महाराष्ट्रात्.कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने या संपामुळे सरकारचीही चिंता वाढलेली आहे.
नीटपीजी कौन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विध्यार्थी रुजू झाले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतोय म्हणूनच जोवर नीटपीजी कॉउंसिलिंग प्रक्रियेच्या संदर्भातील तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहील असे संपकरी मार्ड कडून सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि कॉलेजमधील ओपीडी नोन इमर्जन्सी वार्ड मधेही सेवा न देण्याचा इशारा मार्डणे दिला आहे
नीटपीजी कौन्सिलीनग्चा विषय गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे मात्र त्यावर सरकार फक्त टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे त्यातच दिल्ली पोलिसांनी डॉक्टरांवर केलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे दिल्लीतील सर्व निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचा इशारा दिला होता या संपाला देशातील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळातच देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा कोल्मधून पडणार आहे .मात्र संपकरीडॉक्टरांशी लवकरच चर्चा करून हा संप मागे घ्यायला लावू असे केंन्द्र सरकारकडून सांगण्यात आले आहे
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याने अगोदरच राज्य सरकारची चिंता वाढली होती त्यात आता या संपणे आरोग्यसेवा कोल्मधून पडण्याचा धोका असल्याने सरकारची चिंता वाढली आहे खास करून मुंबई मधी रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि मुंबईतील केइएम नायर,भगवती यासारख्या पालिकेच्या रुग्णालयात अगोदरच डॉक्टरांची संख्या कमी असल्याने या संपामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

error: Content is protected !!