सायन मध्ये बिल्डरसाठी एकवीस झाडांची कत्तल
मुंबई/ एकीकडे आरेचे जंगल वाचवण्यासाठी शिवसेनेने सतेत असताना आक्रमक भूमिका घेतली होती पण दुसरीकडे मुंबई महापालिकेत पालिकेची सत्ता असताना पालिकेचे वृक्ष प्राधिकरण दरवर्षी हजारो झाडांच्या कतल करण्यास परवानगी देत आहेे. त्यामुळेच गेल्या ११वर्षात ४० हजार झाडांची कत्तल करण्यात आली त्यात बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी २१ हजार पाचशे झाडे तोडण्यात आलीी.
सायन कोळीवाडा सरदार नगर२ त्रिलोचन इमारतीच्या पुनर्बांधणी काम सुरू असताना २२झाडे तोडली तर पुनर्विकास नावाखाली ११झाडे हटवली वृक्ष प्राधिकरणाने एका बिल्डर् साठी ही झाडे हटवला परवानगी दिली असा आरोप काँग्रेसने केला आहे .सायन येथे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा ताबडतोब निचरा व्हावा यासाठी वडाळा टीटी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते काही झाडांच्या अडथळ्यामुळे नाल्याचे काम रखडले आहे तर दुसऱ्या बाजूस पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरला झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे या सगळ्यातमोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आता मुंबईकर संशय व्यक्त करीत आहेत