ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

आदित्य ठाकरे यांचे वरळी मतदार संघात संपर्क अभियान सुरू

मुंबई/ शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेतले अनेक नेत्या आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत त्यामुळे ही पडझड थांबवण्यासाठी आता ठाकरे गटाचे नेते आपल्या उरलेल्या पदाधिकाऱ्यांना भेटून गळती थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत .वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सध्या या मतदारसंघात आदित्य ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत ..विभाग प्रमुखापासून उपशाखाप्रमुखांपर्यंत सर्व आजी माझी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत .तसेच त्यांना बळ देण्याचे काम सुरू झालेले आहे कारण आयुष्यातली लढाई सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भाजपा सोबत आहे आणि ही लढाई वाटते तितकी सोपी नाही त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते आता घराबाहेर पडून आपल्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख गटप्रमुख आदींच्या भेटीगाठी घेत आहेत .त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपल्या वरळी मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत.

माजी शाखाप्रमुखाची हकालपट्टी कधी करणार?

वरळी मतदार संघातिल एका माजी शाखाप्रमुखाने पक्षातून असल्याचे दाखवून विरोधी पक्षाला मदत करण्याचे काम करून गद्दारी करत अस्लायची चर्चा विभागातून होत आहे . अशा गद्दार माजी शाखाप्रमुखास पक्षातून हकालपट्टी कधी करणार याकडे जनतेचे लक्ष्य आहे. याने पदावर असताना पक्षाच्या नावावर अनेक कांड केले , प्रचंड माया जमवली. सध्या पक्षात असल्याचे भासवून , त्याचे दुकान चालू असलयामुळे परिसरतील नागरिक नाराज आहेत.

error: Content is protected !!