ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेकडून खड्ड्यांचे राजकारण सुरू


मुंबई/सध्या पावसाळा सुरू आहे आणि मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चालत झालेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पक्षीय राजकारण सुरू आहेच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत पण आता पालिकेनेही मुंबईच्या खड्ड्यांचे राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. प्रकल्प असलेल्या रस्त्यांवरचे खड्डे सध्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत कारण ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार आहे त्या रस्त्यावरचे खड्डे काही बुजवायला तयार नाही आणि नियुक्त कंत्राटदारी त्याकडे बघायला तयार नाही. त्यामुळे हे खड्डे आहेत तसेच आहेत वास्तविक याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंटाळदराची असते परंतु कंत्राटदाराला या खड्ड्यात बद्दल काहीही घेणेदेणे नाही अशा परिस्थितीत पालिकेने खड्डे बुजवून त्याचा खर्च संबंधित कंत्रालदाराकडून वसूल करायला हवा अशी तरतूद आहे. पण पालिकेकडून तसं काहीही घडताना दिसत नाही पालिका रस्त्यावरच्या खड्ड्यांचे राजकारण करीत असल्याचा आरोप आता मुंबईकर करीत आहेत त्यामुळे ज्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल पण तोवर त्या भागातले हे खड्डे तसेच राहणार का आणि तिथे अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणावर असा संतप्त सवाल मुंबईकर करीत आहेत.

error: Content is protected !!