ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

आबांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त!

दोन दिवसांपूर्वी सोमय्यांची तक्रार घेतली,
कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. राजाराम पाटील हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री आर आर पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण राजाराम पाटील यांनी अतिशय नाजूकपणे हातळलं होतं.

शेवटच्या दिवशी आईला सॅल्युट
राजाराम पाटील हे आज पोलीस सेवेतील आपल्या शेवटच्या दिवसाचं कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस सेवेतील अखेरच्या दिवशी कर्तव्यावर जाताना त्यांनी आपल्या मातेला सॅल्युट करुन, कृतज्ञता व्यक्त केली. तात्यांच्या या हळवेपणामुळे, त्यांच्यातील सच्चेपणाचं दर्शन घडतं.

दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मान राजाराम पाटील यांची निष्ठा आणि कामातील तत्परतेसाठी त्यांना दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं

error: Content is protected !!