[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार – नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा


कणकवली/ माझ्या एवढी मातोश्री कुणीही पाहिलेली नाही. त्यामुळे उध्दव ठाकरेंनी माझ्या नादाला लागू नये वेळ आली की सर्व बाहेर काडीन असा इशारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील भाजपा उमेदवार नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे
मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेची आज कोकणात भाजपा उमेदवार नारायण राणे यांच्या साठी जाहीर सभा झाली.या सभेला मनसेचे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई अविनाश जाधव ,संदीप देशपांडे आदी हजार होते.उध्दव ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठीच आम्ही कोकणात आलो आहोत असे मनसे नेत्यांनी सांगितले तर नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या जनहिताच्या कामाचा आढावा घेतला तसेच मला मुख्यमंत्री करायला उध्दव ठाकरेंचा विरोध होता असेही भाषणात सांगितले

error: Content is protected !!