ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सभेतील विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित


दिल्ली/ शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मागील पावसाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घालणारे राज्य सभेतील विरोधी पक्षाच्या १२खासदारांना काल संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले यात काँग्रेस चे ६,शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन तर दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराच्या समावेश आहे
मागील अधिवेशनात या खासदारांनी सभापतींच्या कागद फेकले होते तसेच सभापतींच्या समोरील वेलं मध्ये उभे राहून घोषणाबाजी केली होती त्यामुळे या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी केली होती मात्र याबाबतचा निर्णय राज्य सभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी राखून ठेवला होता आणि आज पहिल्याच दिवशी या १२सदस्यांना असल्याचे सभापतींनी जाहीर केले यात शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी या दोन खासदारांचा समावेश आहे

error: Content is protected !!