ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी


शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले
मुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृती ठिकाणी राणेंना येऊ देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेत राणेंना वाट मोकळी करून दिली त्यामुळे राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेता आले यावेळी आज बाळासाहेब हवे होते असे म्हणत राणे अत्यंत भाऊक झाले होते.
आज मुंबईतून राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली दुपारी राणेंचे मुंबई विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांच्या स्वागतासाठी निलेश आणि नितेश या त्यांच्या दोन पुत्रासोबत विरोधी पक्ष नेते फडणवीस,दरेकर,आमदार कोळंबकर,योगेश सागर,आशीष शेलार,मंगल प्रभात लोढा,प्रसाद लाड आदी नेते आणि असंख्य कार्यकर्ते हजार होते. विमानतळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्यांची यात्रा पुढे बांद्र्याच्या कलानगर जवळ आली. यावेळी तेथे बोलताना राणे म्हणाले की पालिकेत ३२वर्ष सत्ता असलेल्या शिवसेनेच्या पापाचा घडा आता भरला असून आता पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारच आहे.मला कुठल्याही शिवसैनिकांचा विरोध नाही. सेनेत सध्या पैसे कमावण्यासाठी आलेल्या काही लोकांचा विरोध आहे पण त्यांना विचारतोय कोण? शिवसेनेत आता निष्ठावान राहिलेले नाहीत त्यामुळे शिवसेनेची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे उद्धव ठाकरे त्याच्या नावाप्रमाणेच शिवसेनेचा विध्वंस करणार आहे.गेल्या दोन वर्षात या सरकारने महाराष्ट्राला खूप मागे नेले त्यामुळे जनता यांच्या कारभाराला कंटाळली आहे आणि म्हणूनच जनतेसमोर आता भाजप हा एकमेव सशक्त पर्याय दिसतोय असे राणे म्हणाले दरम्यान राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. आज बाळासाहेब असते तर मी केंद्रीय मंत्री झाल्याचा त्यांना खूप आनंद झाला असता असेही ते म्हणाले
दरम्यान कालच्या शक्ती प्रदर्शनानंतर आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपा राणे यांच्यावरच टाकणार आहे हे आता स्पष्ट झाले असून यापुढे राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होईल

शिवसैनीकाकडून स्मूर्ती स्थळाचे शुध्दीकरण
नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतल्यामुळे ते अपवित्र झाली असे सांगून शिवसैनिकांनी गोमुत्रणे स्मूर्ती स्थळाचे स्वच्छ करून बाळासाहेबांच्या तस्विरीला दुधाने अभिषेक केला आणि स्मृती स्थळाचे शुध्दीकरण केले त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशीष शेलार यांनी कडाडून टीका केली आहे

error: Content is protected !!