ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

अभिनेता अरमान कोहलीच्या घरासह ६ ठिकाणी एन सी बी ची धाड;अमली पदार्थांचा साठा जप्त


मुंबई/ प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा अभिनेता पुत्र अरमान कोहली याच्या घरावर तसेच मुंबई,नवी मुंबई आणि वसई विरार मध्ये सह ठिकाणी एन सी बीच्या पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केल्याचे समजते
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एन सी बी अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाने काही ड्रग पेड्राल लोकांना अटक केली होती .त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत आज मुंबईतील वांद्रे,अंधेरी आणि मुलुंड तसेच नवी मुंबईतील खारघर आणि वसई विरार मध्येही धाडी टाकण्यात आल्या .या धाडीत अमली पदार्थांचा साठा हाती लागल्याचे समजते तसेच या प्रकरणी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे . अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर धाड पडल्याने बॉलिवूड मध्ये खळबळ माजली आहे जानी दुश्मन आणि इतर काही चित्रपटात काम केलेला अरमान कोहली हा अभिनेत्री आयेशा झुलका हीचा पती असून राजकुमार कोहली यांचा पुत्र आहे

error: Content is protected !!