[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महर्षी दयानंद कॉलेज ।कला विभाग – बॅच 1987।89 – चवथे स्नेहसंमेलन उत्स्फूर्त साजरे।

मुंबई – दिनांक 25 दिसेम्बर 2024 रोजी चिंचपोकळी निर्मल हॉल येथे महर्षी दयानंद कॉलेज च्या कला विभागातील बॅच 1987- 89 चे चवथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विधार्थनी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी गाणी आणि नृत्य सादर केली। यात हरी मरतल ।प्रकाश जाधव ।किरण तळेकर ।आदेश म्हात्रे।तनिष्क तळेकर ।सुहास सावंत मिलिंद शेट्ये ।यांनी सदाबहार गीते सादर केली ।तर तनया गावडे हिने राम जन्म भूमीवर आधारित भरत नाट्य चे सुंदर नृत्य सादर केले ।तर कविता मिठे हिने देखील हिंदी गीतावर तिच्या सासू सह बहारदार नृत्य केले ।अनेकांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी शेअर केल्या ।आलेल्या विद्यार्थी मध्ये काही व्यावसायिक।पेशाने वकील।तर काही पोलिस अधिकारी तर काही सरकारी सेवेत होते।आणि सर्वात शेवटी सगळ्यांनी सैराट या गीतावर नृत्य करून मनमुराद आनंद लुटला।कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भाटकर।आदेश म्हात्रे।आणि वंदना गावडे यांनी केले।कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप अडमिंन सुनील पांचाळ।मिलिंद गावडे।किरण तळेकर।नंदू कदम , किसनराव जाधव यांनी विशेष मेहनत घेतली।मनीषा फाळके आणि रंजना बिरमुळे ।यांनी सर्वात शेवटी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्त्यांचं आभार मानले।आणि सर्वात शेवटी स्नेहभोजन करून सर्वांनी आठवणींची शिदोरी सोबत नेली ।ती पुन्हा एकदा जोमाने भेटण्यासाठी।-
प्रशांत भाटकर।

error: Content is protected !!