ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मराठी माणसा आता तरी शहाणा हो !

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क आणि सन्मान मिळवून दिला त्यामुळे मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी राहील.पण बाळासाहेबांच्या नंतर आज शिवसेनेत जे काही बघायला मिळतेय ते मराठी माणसाच्या सन्मानाला ठेस पोचवणारे आहे. बाळासाहेबांना कधीही सतेचा किंवा पैशाचा मोह झाला नाही पण आज शिवसेना नेत्यांवर पडत असलेल्या धाडी आणि त्यात सोडत असलेली कोट्यावधींची बेनामी मालमत्ता पहिली की संताप येतो.हा येवढं पैसा यांच्याकडे कुठून आला शिवसेनेचे बहुतेक नेते हे शहरी भागातले आहे त्यामुळे त्यांचा शेतीशी फारसा संबंध नाही . त्यामुळे शेतीतून त्यांच्याकडे येवढं पैसा येण्याचा प्रश्नच नाही आणि शेतीतून येवढं पैसा मिळाला असता तर महाराष्ट्रातली ४० हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली नसती.बरे शहरात कष्ट करून पैसा मिळवायचा झाल्यास बाकीच्या मराठी माणसांवर मुंबईतील घरदार विकून वसई विरार नाला सोपारा कल्याण डोंबिवली बदलापूर अशा ठिकाणी जाण्याची पाळी का आली.फक्त मराठी नेत्यांकडेच कुठून पैसा आला त्यांचे बाप जादे सरदार किंवा मोठे जमीनदार होते का ? मग हा पैसा आला कुठून ? ज्याची साधी सायकल घेण्याची एपात नव्हती तो नगरसेवक झाल्यावर दोनदोन फोर व्हीलर घेऊन फिरतो .आमदार खासदार झाल्यावर त्याच्याकडे बंगले गाड्या शेकडो एकर जमीन यावधी सगळी प्रॉपर्टी येते कुठून? कोण कुठला प्रताप सरनाईक राष्ट्रवादीत असताना त्याच्याकडे काहीही नव्हते शिवसेनेत आला आणि त्याला जणू काही कुबेराने दत्तक घेतले एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे आली हा सगळा मेहनतीचा पैसा आहे का आणि असेल तर प्रताप सरनाईक सारख्या नेत्यांचे सामान्य शिवसैनिक कार्यकर्ते अजूनही बैठ्या चाळीत किंवा झोपडपट्टीत का राहतात

आज मुंबईत जेमतेम 30 टक्के मराठी माणूस राहिलाय.तोही हळू हळू मुंबई सोडण्याच्या तयारीत आहे आणि त्याला रोखण्यासाठी शिवसेनेने कोणतीही पर्भवी उपाय योजना केलेली नाही . एस आर ए सारख्या योजना राबवताना मुख्यमंत्री सांगत आहेत की मराठी माणसाने हक्काचे घर सोडू नये पण या हक्काच्या घरात राहण्यासाठी पोटापाण्याची व्यवस्था व्हायला नको का ? आज आमच्या मुलांना आम्ही काबाड कष्ट करून पदवी पर्यंतच्या शिक्षण द्यायचे आणि त्याने बेरोजगार बनून घरात बसायचे मग जगायचं कसं? बरे राजकारणात करियर करायला जावे तर तिथे जागा अडवून बसलेले लोक त्यांच्या पोराबळाना पुढे आणतात.बापाने चार पाच वर्ष नगरसेवक पदाचा उपभोग घेतल्यावर त्याच्या जागेवर त्याचा मुलगा दावा करणार तो नगरसेवक होणार पण त्याच्या बापाचे २० वर्ष नगरसेवक पद टिकवण्यासाठी ज्या सामान्य शिवसैनिकांनी रक्त आणि घाम आटवला त्याच्या पोरांना मात्र साधा नोकरी धंदाही मिळायला तयार नाही .त्यानेही आपल्या बापा प्रमाणे आयुष्यभर पक्षाची चाकरी करायची स्वाभिमान आणि अस्मिता जपण्याच्या नावाखाली आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आशा आकांक्षांची होळी करायची हा कुठला न्याय? म्हणूनच आज जे शिवसेना नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडचणीत आले आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरू नये.या लोकांकडे आज भ्रष्ट मार्गाने आणि शिवसेना पक्षचा नावावर कमावलेला अफाट पैसा सापडतो आहे यातले पाच पैसे तरी कधी या लोकांनी सामान्य गरजू शिवसैनिक कार्यकर्त्यांसाठी दिले आहेत का ? या लोकांकडे अफाट पैसा आहे पण तो त्यांच्या मुलाबळासाठी आहे या लोकांना मोठे करणाऱ्या सामान्य शिवसैनिक कार्यकर्त्यांसाठी नाही. आमच्या सामान्य शिवसैनिकांनी रक्त आणि घाम गाळून नेत्यांना मोठे केले आणि स्वतः मात्र कंगाल राहिले आणि म्हणूनच त्यांच्यावर आज मुंबई सोडण्याची पाळी आली आहे.शिवसेना नेत्यांवर पडत असलेल्या धाडी आणि या धाडीत त्यांच्याकडे सोडत असलेली कोट्यावधींची बेनामी संपत्ती या सर्व गोष्टीतून अस्मिता आणि पक्ष निष्टेसाठी झिजनाऱ्या सामान्य शिवसैनिकांनी बोध घ्यावा.अरे हे नेते आणि आपण एकाच पक्षात आहोत ना! मग आज त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही इतका पैसा सापडत आहे. आणि आम्ही कर्ज कडून जगतोय बापाने आमच्यासाठी काही केलं नाही म्हणून आमची पोर आम्हाला शिव्या आणि लाथा घालत आहेत तरीही आम्ही अजून पक्षासाठी मरायचे का? जो वेळ निष्ठावान शिवसैनिक म्हणुन पक्षाला दिला त्याच वेळे मध्ये आम्ही जर काही उत्पन्नाचे वेगळे मार्ग शोधले असते तर आज मुंबईतले घर विकून मुंबई बाहेर जाण्याची पाळी आली नसती.आता ज्या शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई होतेय त्यांच्यासाठी वसई विरार किंवा कल्याण डोंबिवली वरून येऊन आम्ही आंदोलने करायची? म्हणजे पैसे त्यांनी कमवायचे आणि सामान्य गरीब मध्यमवर्गीय शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी आंदोलने करायची पोलिसांच्या लाठ्या खायच्या केसेस घ्यायच्या हा कुठला न्याय? शिवसैनिक मित्रानो आजवर आपण खूप सहन केलं पक्ष आणि बाळासाहेबांच्या नावासाठी त्यांच्या पश्चात सुधा पक्षासाठी खूप काही केले पण त्याची आजच्या पक्ष नेतृत्वाला कदर नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. आजही शिवसेनेत ज्यांना काही मिळालेले नाही असे हजारो प्रामाणिक शिवसेना कार्यकर्ते पक्षासाठी इमाने इतबारे काम करीत आहेत. पण भ्रष्टाचारी नेत्यांसाठी आता कुठल्याही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरू नये कारण शिवसेना समाजकरणासाठी आहे मराठी माणसाच्या नावावर नेत्यांना पैसे कमावण्यासाठी नाही येवढंच ध्यानात ठेवावे

error: Content is protected !!