ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य – मराठा आंदोलकांचा मोठा विजय


मुंबई/मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा घेऊन आलेल्या सरांगे पाटील यांच्या बहुतेक मांगण्या सरकारने मान्य केल्यामुळे या आंदोलनाचा शेवट गोड झाला आहे मात्र सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील असे जरांगे पाटील यांनी सांगितले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या लाखो आरक्षणा आंदोलकांस मुंबईच्या दिशेने कुच केली होती. लाखो मराठे मुंबईला येणार हे पाहून सरकार अस्वस्थ झाले होते मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठ्यांच्या कुणबी नोंदी असलेल्या 54 लाख लोकांना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल अशा लोकांना आरक्षणाचा लाभ देऊ अशी लेखी हमी तसेच त्या पद्धतीचा जीआर सरकारने जरांगेच्या हाती दिल्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी जवळपास मान्य झालेली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी जे क्युरेटिव्हिटीशन दाखल आहे त्याचा निर्णय लागेपर्यंत मराठ्यांना शैक्षणिक सवलत ही मिळणार आहे .सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांनी जल्लोष केला आणि विजयाचा गुलाल उधळला तर ह्या गुलालाचा अपमान करू नका असा इशारा जरागे पाटील यांनी सरकारला दिला आहे

error: Content is protected !!