[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा

मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली.,

जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मदतीला मुंबई भाजपा मैदानात उतरली आहे. यासाठी भाजपाच्या मुंबई स्थानिक शाखेच्या अध्यक्षांनी राज्यपालांची भेट घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्याला राज्यमंत्र्यांनी उघडपणे धमकावल्याच्या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली.

error: Content is protected !!