ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

400 अनधिकृत फेरीवाले हटविले-पालिकेच्या तीन वार्डची प्रथमच संयुक्त कार्रवाई मौलाना शौकत अली रोड वरील 400 अनधिकृत फेरीवाले हटविले

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून संबोधल्या जाणार्‍या पालिकेच्या सी,डी आणि ई विभागात विभागलेल्या मौलाना शौकत अली रोड वरील जवळपास 70 अधिकारी कर्मचारी,10 वाहने यांनी 400 अनधिकृत फेरीवाले जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने अनधिकृत फेरीवाले आणि रस्यावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
या कार्रवाईत अनधिकृतपणे
रस्त्यावर अतिक्रमण करीत फेरीवाले,फर्निचर,लादी,भंगार चे साहित्य उभे करणा-या विक्रेत्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोड़क कारवाई करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड (डी),चक्रपाणी अल्ले (सी) आणि मकरंद दगड़खैर (ई) यांनी संयुक्त कारवाई केली.वीपी रोड वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत बावधणकर यांच्या सह तीन पोलिस वाहने आणि 5 अधिकारी-15 पोलिस अंमलदार यांचा मोठा बंदोबस्त असल्याने फेरिवाल्यांकडून विरोधाचा प्रयत्न ही झाला नाही.
हा विभाग मुस्लिम बहुल विभाग असून अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो.रस्यावरील जागा अडवून फेरिवाल्यांचे असलेले बस्तान आणि मनमानी पद्धतीने लावलेल्या दुचाकी गाड्या यांच्या मुळे रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.त्यामुळे लोक पोलिस आणि पालिकेला दूषणे देत असत. येथील मौलाना शौकतअली रोड वरुन रोजच जा-ये करणार्‍या नोकरदार, व्यापारीवर्ग,सोने,चांदी,हिरे,मोती,स्टील,कॉपर,इमिटेशन ज्वैलरी,शासकीय कार्यालय कर्मचारी कामावर जाताना त्रासलेले दिसत असत.त्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
पालिकेच्या डी विभागाचे सहा.अभियंता मानोहर कुळकर्णी,रस्ते अभियंता, अभिजीत रसाळ,अभिषेक नातू,सतिष कांबळे वरिष्ठ निरिक्षक (आतिक्रमण निर्मुलन) मोरे आदींच्या पथकाने कारवाई केली . कारवाई नंतर रस्ता मोकळा झालेला आहे.या कार्रवाईचे नागरिकांनी स्वागत केले.

आम्हाला नगरसेवक,आमदार, ट्राफिक पोलिस आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे आम्ही परिमंडल एक चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शना खाली सी,डी आणि ई विभागाने मौलाना शौकत अली मार्गावर संयुक्त कारवाई करीत अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर लाकडी फर्निचर, भंगार,लादी विक्रेते यांनी केलेल्या अतिक्रमणास हटवून नागरिकांना रहदारीस रस्ता मोकळा करुन दिला.

error: Content is protected !!