ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

रस्ते विभागाच्या गोरेगांव कार्यालयात चुलबुल पंटरचा धुमाकुळ-

सूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार 2014 -2015 साली रस्ते घोटाळा झाला होता.या घोटाळ्यांमध्ये अनेक कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्यात आलं होतं. ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाई करण्यात आली. त्याची चौकशी चालू आहे. पण याच कंपणीतील मातबर ब्लॅक लिस्टेड कंपणीचा एक पंटर (चुलबुल)रस्ते विभागाच्या गोरेगांव कार्यालयात धुमाकुळ घालत आहे. पालिका कार्यालयात सैदव ठाण मांडून बसलेला असतो. याचे गुढ सर्वाना पडले आहे. हा पंटर उपस्थित अभिंयता आणि भेटीला येणार्‍या अधिकार्‍याची कंत्राटदारांची माहीती ठेवतो. याच्याकडे अनेकांची गुपीते माहीती असल्यामुळे या पंटरला अनेक अभिंयते आणि अधिकारी वचकुन असतात. याची लुडबुड प्रामाणिक अधिकार्‍याना सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परस्थिती आहे, त्यावर बोलायला कोण धजत नाही. कसेही वागले तरी चालेल आपल्याला कोण रोखणार कोण? विचारणार कोण? अशी भावना या पंटरच्या वागण्यातून निर्माण झाली असून या पंटरला कार्यालयाबाहेरचा रस्ता दाखवणार कोण? असा सवाल केला जातोय.
पालिका अभिंयताच्या रिक्त खुर्चीवर बसून इतर कंत्राटदाराच्या माणसांना आदेश देताना दिसतो. दरदिवशी कागदपत्रे अधिकार्‍यांना देंण्याच्या नावाखाली तासतास गोरेगांव कार्यालयात बागडत असतो. तो कोणाच्या आर्शिवादाने? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या कंत्राटदाराच्या पत्रावर हा गोंरेगांव पालिका कार्यालयात ठाण मांडून बसलेला असतो. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. उपप्रमुख अभिंयता मनोज कामत यांनी कायदयाचा धाक निर्माण करून पंटरचा धुमाकुळ थांबवावा
एक वर्षापूर्वी या पंटरची आणि एका माहीती अधिकार कार्यकरता याची हाणामारी गोंरेगांव कार्यालयाबाहेर झाली होती त्याचे पडसाद रास्ते विभागात उमटले होते. काही काळानंतर त्याच्यात सलगी झाली. अशा चुलबुल पंटरची अनेक गुपिते पुढील अंकी वाचा.

error: Content is protected !!