ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

यापुढे शासकीय शाळांमध्ये सिसी टिव्ही


ठाणे/ येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये टप्प्या टप्प्यान सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे या घोषणामुळे पालक आणि शिक्षक वर्गाने समाधन व्यक्त केले असले तरी हे सीसीटीव्हीचा अंमलबजाणी कधी होणार याची चर्चा सुरु आहे.
वर्षा गायकवाड म्हणाले की, ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. राज्यात एकूण 65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यासर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखील चालणार नाही तर त्याची व्यवस्थित देखभाल होण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. तसेच गैरप्रकारांना आळा बसेल.असे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

error: Content is protected !!