11 तारखेच्या न्यायालयीन सुनावणी नंतर मुहूर्त अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक – मंत्रिमंडळाचे गठण लांबणीवर
मुंबई/ बंडखोर आमदारांच्या पात्र अपात्र तेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच मंत्री मंडळाचे गठण होणार आहे.त्यामुळे 11 तारखेच्या नंतरच मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल असे दिसते
महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले आहे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला आहे शिवाय सरकारने विश्वास दर्शक ठराव सुधा जिंकलेला आहे आता फक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात यायचे आहे त्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची एक बैठक झाली या बैठकीत मंत्रिमंडळाच्या निवडीबाबत तसेच पालकमंत्री पदाबाबत सुधा चर्चा झाल्याचे समजते मुंबईचे पालकमंत्रिपद बंडखोर सेना गटाचे आमदार सदा सरवणकर याना मिळणार असल्याचे समजते तर आघाडी सरकारमध्ये जे शिवसेनेचे मंत्री होते त्यापैकी काही प्रमुख आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे .यात अब्दुल सत्तार,संदीपान भूमी,शंभूराजे देसाई उदय सामंत दीपक केसरकर यांचा प्रामुख्याने समावेश असेल तर भाजप कडून चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार नितेश राणे यांची वर्णी लागू शकते.