ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

गोळीबारात जखमी झालेल्या शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

कल्याण -भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांना आज ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल २४ दिवसानंतर आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले दरम्यान घरी आल्यावर महेश गायकवाड यांची पुन्हा तब्बेत बिघडल्याने डॉक्टरांना बोलवावे लागले पण आता ते ठीक आहेत

error: Content is protected !!