ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर


मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान माझे ते विधान पंत प्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका गावगुंड असलेल्या मोदी बद्दल होते असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे
भंडारा येथे एका जमावा समोर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले होते की मी मोदींना शिव्या घालू शकतो त्यांना मारू शकतो त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात एकाच खळबळ उडाली भाजपचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी नानाचा पुतळा जाळला मोर्चे कड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले एकूणच या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे .भाजपा कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून नाना पटोले यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नानांचा निषेध करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे तर काँग्रेस आता पक्ष राहिला नसून दहशतवादी संघटना बनली आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की नानांच्या विरी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या काय तक्रारी आहेत त्या बघून पोलीस प्रशासनाशी चर्चा करून पुढे काय करायचे ते ठरवू असे म्हटले आहे
बॉक्स
..तर नानाचा पंजा तोडून टाकू/ माजी मंत्री बोंडे
मोदींना मारण्याची भाषा करणारे नाना पाटोळे हे शाहिस्तेखान असून वेळ आली तर त्यांच्या हाताची बोटेच नाही तर हाताचा पंजा तोडून टाकू असा इशारा माजी मंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे तर भाजपा कार्यकर्त्यांनी पुण्यात बॅनर लाऊन हिम्मत असेल तर नानांनी पुण्यात येऊन दाखवावे असे त्यांना जाहीर आव्हान केले आहे

error: Content is protected !!