ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे…

भिवंडी दि 25(आकाश गायकवाड )ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात असताना केंद्र शासनाच्या 14 वित्त आयोगा मार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीस दिलेल्या 11 लाख रुपयांच्या निधींवर चक्क ग्रामसेविकेने डल्ला मारला असून तिला निलंबित करण्याच्या मागणी साठी ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले आहे .

भिवंडी तालुक्यातील दुगाड या ग्रामपंचायतीस 14 वित्त आयोगातून सुमारे 14 लाख रुपये उपलब्ध झाले असता ग्रामसेविका हर्षदा गुळवी यांनी आर्थिक वर्ष 2019 – 2020, व 2020 – 2021 या काळात लॉक डाऊन मुळे ग्रामसभा व ग्रामपंचायत मासिक सभा प्रत्यक्ष होत नसल्याचा फायदा घेत तब्बल 11 लाख 4 हजार 220 रुपयांचा निधी कोणत्याही खर्चाची ग्रामपंचायत कार्यालयीन कागदपत्रात नोंद न करता खर्च केले आहेत , या गैरव्यवहारा मधील एक ही देयक धनादेशा द्वारे न देता रोखीने दिले आहेत हे विशेष असून ग्रामस्थांनी या बाबत पंचायत समिती ,जिल्हा परिषद प्रशासनाकडे मार्च महिन्यापासून पाठपुरावा करून कारवाईची मागणी करून ही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी दुगाड ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले असून येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत ग्रामसेविका हर्षदा गुळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करीत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत उघडणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी बोलून दाखविला आहे .

error: Content is protected !!