ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

फूड अँड व्हिल्स मुळे फेरीवाल्यांच्या पोटावर पाय


मुंबई/ राज्याचा विकास करताना किंवा महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नावे नवे उपक्रम राबवताना इतरांचा रोजगार छिन्ला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते .पण महाराष्ट्र सरकारं किंवा मुंबई महापालिकेला त्याचा विसर पडलेला दिसतोय कारण मुंबईत देशभरातून आलेले फेरीवाले पोटापाण्यासाठी रस्त्यावर किंवा हातगाडीवर मालं घेऊन दिवसभर उन्हा तन्हात फिरून धंदा करीत असताना .आता पालिकेने फूड अँड व्हीलस सारख्या व्यवसायांना परवानगी दिली आहे खाद्य पदार्थाचे हे ट्रक मुंबईभर फिरून त्यांचा माल संपूर्ण मुंबईत विकणार आहेत .सध्या 50 फूड अँड व्हीलस साठी परवानगी देण्यात आली आहे भविष्यात 50 चे 500 व्हायला वेळ लागणार नाही मात्र खाद्य पदार्थांच्या या फिरत्या आणि जलद विक्रीमुळे वडापाव, भजीपाव ,डोसा विक्री ,किंवा अन्य पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय येणार आहे कारण या फूड अँड व्हील च व्यवसाय वेगवान असल्याने मुंबईच्या कोणताही भागात दिवसभर त्यांना फिरता येणार असल्याने त्यात्या भागात फेरीवाले म्हणून धंदा करणाऱ्या लोकांच्या पोटावर पाय येणार आहे. शिवसेनेला पालिका निवडणुकीत निश्चितपणे याचे परिणाम भोगावे लागणार आहेत

error: Content is protected !!