ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची पूर्वापार पद्धत आहे .त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना.म.जोशी मार्गावर शाखेजवळ झालेल्या या सोहळ्यासाठी नायरचे अधिष्ठाता भारमल तसेच सायंन रुग्णालयाचे अधिष्ठाता जोशी यांच्या सह जी साऊथ विभागाचे एम.एच .ओ बांगर. आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसेच सत्कारमूर्ती महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या.

error: Content is protected !!