[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

मुंबई – मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्यावर आज दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले यावेळी बॉलिवूडमधून फक्त जावेद जाफरी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक राजदत्त, संगीतकार अजय आणि अभिनेत्री पूजा पवार, नेहा पेंडसे यांनीच पार्थिवाचं दर्शन घेतलं.

मराठी सिनेमा सृष्टी आणि बॉलिवूडमधून अजूनपर्यंत एकही मोठा स्टार अंत्यदर्शनाला आलेला दिसला नाही. दरम्यान, यावेळी सीमा देव यांचे कुटुंब आणि इतर नातेवाईक आणि कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले.

error: Content is protected !!