ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

गणेशोत्सवाशी निगडीत सर्व कामे वेळेवर पूर्ण करा – पालिका आयुक्तांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश

 दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यंदाही तीच परिस्थीती असून खड्ड्यांबरोबरच रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर होणाऱ्या असमतोल रस्त्यांचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा मोठा मनस्ताप होत आहे. खड्ड्यांवरूनही मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकांसह अन्य पालिकांवर ताशेरे ओढले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मनुष्यबळाच्या संख्येत वाढ केली असून पूर्वी नेमलेल्या ७५ अभियंत्यांसह प्रत्येक निर्वाचन प्रभागनिहाय अभियंता अशा एकूण २२७ दुय्यम अभियंत्यांची नेमणूक पालिकेने केली आहे. मात्र खराब रस्त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचा फटका गणेशोत्सव मंडळांनाही आगमन आणि विसर्जनावेळी बसण्याची शक्यता आहे.गणेशोत्सवाआधी रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळ आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने मुंबई महापालिकेकडेही केली होती. त्यानुसार गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या आणि वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच धर्तीवर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्ते सुस्थितीत राखण्याच्या दृष्टीने सर्व विभाग कार्यालयांसह रस्ते विभागाला लेखी निर्देश दिले आहेत.

पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश वेलरासू यांनी दिले आहेत

error: Content is protected !!