ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण

मुंबई दि. 25 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे.

या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात मोठी वाढ साधण्याच्या आमच्या उद्दिष्टानुसार हा व्यवहार झाला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये ‘डेल्हिवरी’ने ‘बी-टू-सी लॉजिस्टिक्स’मध्ये आघाडीचे स्थान मिळविले आणि आता आमच्या ट्रकलोड व्यवसायातील काही भाग ‘स्पॉटॉन’सोबत जोडला आहे.
स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे व्यवस्थापकीय संचालक अभिक मित्रा म्हणाले, “स्पॉटॉन टीम आणि मी ‘डेल्हिवरी’च्या वाढीच्या आणि मूल्य-निर्मितीच्या प्रवासाचा भाग होण्यास उत्सुक आहोत. ‘डेल्हिवरी’च्या टीमने भारतात अग्रगण्य अशी ‘एंड-टू-एंड लॉजिस्टिक्स’ व पुरवठा साखळी सेवा कंपनी उभी करण्याचे जबरदस्त काम अल्पावधीतच केले आहे

error: Content is protected !!