[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मथुरेत पाकिस्तानी पंखा – साधूच्या वेशात आलेल्या महिलेचा शोध सुरू

मथुरा/भगवान श्रीकृष्णाची नगरी अशी ओळख असलेले मथुरा हे उत्तर प्रदेशातील असणारे त्या संपूर्ण भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे मात्र भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सहावीच्या विषयात एक महिला पंखा रिपेरिंग करण्यासाठी आली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पंख्यावर मेड इन पाकिस्तान असे लिहिलेले आहे त्यामुळे आपण काही आलेली महिला कोण याचा आता पोलीस शोध घेत आहे
उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पंखा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक महिला साधूच्या वेषात पंखा दुरुस्त करण्यासाठी घेऊन आली होती. दुकानदाराने पंख्यावर ‘Made in Pakistan’ लिहिलेलं पाहिलं आणि पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली असून या साधूच्या वेषातील महिलेचा शोध घेत आहेत. स्थानिकांनी तर या परिसरात बांगलादेशी नागरिक लपलेली असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या बांगलादेशी नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या महिलेचा शोध सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल , असं एसपी सुरेश चंद्र रावत यांनी सांगितलं.मथुराच्या गोवर्धन परिसरातील ही घटना आहे. एक महिला साधूच्या वेषात आली होती. ही महिला पंखा दुरुस्तीसाठी घेऊन आली होती. पंखा खराब झाल्याने तिने हा पंखा दुकानदाराला दुरुस्तीसाठी दिला. दुकानदाराने पंखा ठेवून घेतला. जेव्हा दुरुस्त करायला सुरुवात केली तेव्हा त्यावर ‘Made in Pakistan’ असे शब्द लिहिले होते. हे शब्द पाहून तो दचकला. त्याने लगेच या पंख्याचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!