ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डोंबिवलीतील अमुदन कंपनीच्या मालकाला अटक

डोंबिवली -डोंबिवलीतील एमआयडीसी भागात असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेत १३ कामगार ठार झाले होते. तसेच ६५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. याबरोबरच त्या कंपनीच्या शेजारील काही कंपन्यांचंही मोठ्या प्रणाणात नुकसान झालं होतं. स्फोटानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला होता. आता या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक केली आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर कंपनीच्या मालक मालती मेहता या नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाशिक पोलीस आणि ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सयुक्त कारवाई करत कारवाई केली. दरम्यान, त्यांना ठाणे पोलिसांकडे सोपवण्यात येणार असून घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!