ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुण्यातील पब वर बुलडोजर फिरवले आता मुंबईतले बेकायदेशीर पब कधी तोडणार मुंबईकरांचा सवाल


मुंबई/पुण्यात वेदांत अग्रवाल या लक्ष्मी पुत्राने दारूच्या नशेत ताशी 200 किलोमीटर वेगाने गाडी चालवून एका तरुण तरुणीचा जीव घेतला त्यानंतर सरकार आणि महापालिकेलाही जाग आली आहे पुणे महापालिकेने पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बारवर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली आहे काल जवळपास सात ते आठ बार वर बुलडोजर फिरवण्यात आला ज्याप्रमाणे पुण्यात पॉप संस्कृती जोर गरज होती त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात मुंबईमध्ये बार संस्कृती वाढत चालली आहे त्याच्यावर ही अशीच कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर जनता करीत आहे
मुंबईमध्ये परेल,वांद्रे ,खार, जुहू, घाटकोपर, मुलुंड, ग्रँड रोड ,मलबार हिल , बॉम्बे सेंट्रल आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बार आणि पब आहेतया बार आणि पब मध्ये रात्रीच्या वेळेला श्रीमंत घराण्यातील मुले आणि मुली दारू प्यायला जातात दारू प्यायल्यावर बेधुंद होतात आणि रात्री उशिरा पहाटे तीन चार वाजता बार आणि पब मधून बाहेर पडतात तिथून एकतर लॉज किंवा हॉटेलवर जातात किंवा घरी जातात मात्र घरी जाताना दारूच्या नशेत बेफाम गाडी चालवतात त्यामुळे पुण्यासारखे अपघात होण्याची शक्यता आहे यापूर्वी अशाच एका दारुड्या बाईने गाडी चालवून एक पोलिस अधिकारी आणि एका वकिलाचा जीव घेतला होता त्याचबरोबर एका लक्ष्मी पुत्राने फुटपाथ वर झोपलेल्यांना चीरडले होते त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता हे सगळे प्रकार जर थांबवायचे असतील तर मुंबईतील पब आणि बारवर कारवाई होणे गरजेचे आहे

बारमध्ये दारू विक्री बाबत कठोर नियम आहे मात्र हे नियम डावलून 14ते 15 वर्षाच्या मुलांनाही बार मध्ये दारू दिली जाते आणि ते नशेच्या आहारी जातात त्यानंतर मग त्यांची पावले चुकीच्या मार्गाकडे वळतात हा चुकीचा मार्ग त्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकतो रहाता राहिला सवाल बार आणि पब चां परवान्यांचां तर मुंबईत असे कितीतरी बार आणि पब आहेत ज्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा लायसन्स असली तरी ती वर्षंन वर्ष त्यांनी रिन्यू केलेली नाहीत .केवळ पोलिसांना हप्ते देऊन हे बार आणि पब मोठ्या प्रमाणात चालतात पब मध्ये डान्स करायला येणाऱ्या मुले आणि मुली दारू पिऊन झिंगली की मग कोणही कुठल्याही मुलीला घेऊन जातो आणि त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या भयंकर असतात . कित्येक वेळा तरी एक मुलगी आणि तीन तीन चार चार मुले असाही प्रकार होतो परंतु ही विकृती हाय सोसायटीतल्या मुलांमध्ये जितके आहे तितकीच मुलींमध्ये सुद्धा आहे कारण कोण काय कुठल्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेत नाही तर ती मुलगी स्वतःहून त्या मुलांबरोबर जाते आणि दारूच्या नशेत नको त्या गोष्टी होतात हा सगळा विकृत लैंगिक स्वयराचार केवळ आणि केवळ बार आणि पब संस्कृतीमुळे सुरू आहे सुरू एखाद्या पब मध्ये सभ्य माणूस जाऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी कर्ण कर्कश संगीताच्या तालावर जे नाच गाणे सुरू असते त्या नाच गाण्याच्या वेळी अत्यंत बीभत्स प्रकार सुरू असतात कोणीही कुठल्याही मुलीला कुठेही हात लावत असतो काहीही करत असतो परंतु त्या मुलीकडून कुठल्याही प्रकारचा विरोध होत नाही याचा अर्थ तिलाही ते हवे असते आणि हे सगळे दारूमुळे घडते दारूमुळे आणि अमली पदार्थांमुळे तरुणाईच्या लैंगिक भावना चालवतात आणि त्यानंतर मग नको ते प्रकार घडतात दुर्दैवाची गोष्ट अशी की हाय सोसायटीतल्या मुलांना त्यांच्या सुधारणावादी पालकांनी मोकळीक दिलेली असते त्यामुळे ही पोर बिघडतात जर मुलांना एक लाख रुपये पॉकेट मनी दिला तर ती मुले असा वाह्यात खर्च करणारच! पुण्यातील रस्त्यावर अपघात करणारा वेदांत अग्रवाल याने 48 हजार रुपयाची दारू विकत घेतली होती यावरून हाय सोसायटीतल्या मुलांना त्यांचे पालक किती पैसा देतात याचा अंदाज येऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की या पब संस्कृतीमुळे हे पब ज्या परिसरात आहेत त्या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो कारण रात्री दोन दोन तीन वाजेपर्यंत हे पब चालू असतात आणि त्या ठिकाणी नाच गाणी संगीत आणि आरडाओरडा सुरू असतो शिवाय पब मधून बाहेर पडलेले मुले बिनधास्त कशीही गाडी चालवतात त्यामुळे एखादा मध्यमवर्गीय माणूस कामधंद्यावरून येत असेल त्या रस्त्याने तर तो अपघातात सापडू शकतो अशी आज मुंबईची परिस्थिती आहे लोअर परळच्या कमला मिल मध्ये काही वर्षांपूर्वी टेरेसवर अशाच प्रकारची एक पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीत एक भयानक हादसा घडला पार्टीसाठी जो मंडप घातला होता त्या मंडपाला आग लागून जवळपास 30 ते 35 तरुण-तरुणींचा मृत्यू झाला होता मात्र त्यानंतरही आज मुंबईत अनेक टॉवरमध्ये जे टेरीस आहेत त्या टेरीसवर अशा तऱ्हेचे मंडप घालून पार्टी आयोजित केल्या जातात परंतु महानगरपालिका किंवा पोलीस हे मॅनेज असल्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि अपघात घडतात म्हणूनच सरकारने ही पब संस्कृती बाल संस्कृती तात्काळ बंद करणे आवश्यक आहे

error: Content is protected !!